
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: पालघर जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हा दौरा; तळवे आणि गव्हाळी ग्रामपंचायतींची केली पाहणी!

नंदुरबार: सन २०२५-२६ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत केलेल्या कामांच्या जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी पालघर जिल्हा परिषदेची उच्चस्तरीय समिती सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हात तळवे आणि गव्हाळी ग्रामपंचायतींची केली पाहणी

दिनांक २१ मे २०२६ ते २५ मे २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत ही समिती नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन उत्कृष्ट ग्रामपंचायतींना भेटी देऊन अभियान कालावधीत केलेल्या कामकाजाचे मुल्यमापन करणार आहे.

याच दौऱ्याचा एक भाग म्हणून, आज दिनांक २२ मे २०२६ रोजी या मूल्यांकन समितीने तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील कामकाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण व मूल्यांकन केले.
उच्चस्तरीय समितीमध्ये ‘या’ मान्यवरांचा आहे समावेश:
ग्रामपंचायतींच्या कामाचे काटेकोर आणि पारदर्शक मूल्यमापन करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी या समितीमध्ये समाविष्ट आहेत:

पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से.), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अशोक पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर, उप जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मनरेगा) अतुल पारसकर, विस्तार अधिकारी (पंचायत) राजू कोळी, पत्रकार तथा जिल्हा प्रतिनिधी, पालघर गणेश पाटील, या समितीत समावेश आहे.
तळोदा तालुक्यातील तळवे आणि अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी ग्रामपंचायतींचे मूल्यांकन दिनांक २२ मे रोजी या समितीने आपल्या नियोजित दौऱ्यानुसार ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेट दिली:
ग्रामपंचायत तळवे (ता. तळोदा): समितीने तळवे ग्रामपंचायतीला भेट देऊन अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध विकास योजना, प्रशासकीय कामकाज, आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली.
ग्रामपंचायत गव्हाळी (ता. अक्कलकुवा): यानंतर समितीने अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी ग्रामपंचायतीला भेट दिली. येथे ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या पायाभूत सुविधांचा विकास, महिला व बालविकास विभागांतर्गत झालेली कामे आणि मनरेगा अंतर्गत झालेल्या रोजगार निर्मितीच्या कामांचे मूल्यांकन करण्यात आले.
या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि समृद्ध बनवणे हा आहे. पालघर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या पंचायत राज व्यवस्थेतील अनुभवांची देवाणघेवाण होण्यास मोठी मदत होणार आहे. हा दौरा २५ मे २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील निवडक ग्रामपंचायतींचेही मूल्यांकन केले जाणार आहे.
मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान #नंदुरबारदौरा #पालघरजिल्हापरिषद #ग्रामविकास #पंचायतराज #तळोदा #अक्कलकुवा #तळवेग्रामपंचायत #गव्हाळीग्रामपंचायत #ग्रामीणविकास #MSRPA2026 #MaharashtraGovernment #RuralDevelopment
- 0
- 0
- 0
- 0





