शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत श्री हरिश्चंद्र चौधरी यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक

नंदुरबार /सप्त नगरी न्युज
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्यामार्फत आयोजित शिक्षक व अधिकारी स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत आदर्श मराठी विद्यामंदिरातील शिक्षक श्री हरिश्चंद्र बन्सीलाल चौधरी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत चौधरी यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना, प्रभावी सादरीकरण आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा उत्कृष्ट संगम साधत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शैक्षणिक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अधिक सुलभ, रंजक व परिणामकारक कसे करता येईल, याचे उत्तम उदाहरण चौधरी यांच्या व्हिडिओतून दिसून येते. त्यांच्या या यशाबद्दल सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन अ़ॅड. रमणभाई शाह, साचिव डॉ. योगेशभाई देसाई, प्राचार्य सौ सुषमा शाह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे तसेच गुजराती विभागाचे प्रमुख भद्रेश त्रिवेदी यांनी अभिनंदन केले असून पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





