नंदुरबार

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि ध्वजारोहण

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि ध्वजारोहण

नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो

नंदुरबार शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर येथे 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतमाता प्रतिमा पूजन आणि तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले.
                   याप्रसंगी दंत सर्जन डॉ. यश अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. पूजा अग्रवाल यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले तर बालरोग तज्ञ डॉ. सुदर्शन सूर्यवंशी यांनी शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. भारत माता की जय… वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम बाबत राबविणार असल्याची माहिती दिली.प्रजासत्ताक दिनाचे संयोजन मंडळाचे जेष्ठ सल्लागार जी. एस. गवळी, संभाजी हिरणवाळे तसेच सदस्यांनी केले. ध्वजारोहण कार्यक्रमास निवृत्त वीज कर्मचारी मोहन वाडीले, रामदास दगडू जाधव, वासुदेव राव, सुरजमल तोष्णिवाल, भाऊसाहेब गिरासे, भास्कर रामोळे, नितीन तावडे, डॉ. भूषण पालकडे, विशाल हिरणवाळे, सुदाम हिरणवाळे, जय मराठे तसेच महिला मंडळाच्या वतीने सुनिता हिरणवाळे, वंदना जवेरी, कविता गवळी, भाग्यश्री हिरणवाळे, चैताली हिरणवाळे, चंद्रकला भोई, दिपाली हिरणवाळे यांच्यासह परिसरातील शालेय विद्यार्थी, महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *