
तळोदा प्रवासी महासंघातर्फे रथ सप्तमी निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन ..
तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत तर्फे आयोजित करण्यात आला .

तळोदा येथील प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीतर्फे रथसप्तमी व स्थापना दिवस निमित्त बस स्थानकावर विविध उपक्रम राबविण्यात आले बस स्थानकावरील प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या प्रवास सुखाच्या व्हावा म्हणून त्यांना शुभेच्छा ही देण्यात आल्यात .

ग्राहक पंचायतीच्या व प्रवासी महासंघाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे प्रवाशांना आनंदाच्या व समाधानाच्या व आश्चर्यकारक सुखद धक्का बसला त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्रवाशांना चांगली सेवा देणारे त्यांच्याशी सौजन्याने वागणारे वाहक चालक विभाग नियंत्रक व इतर परिवहन कर्मचाऱ्यांच्या गौरव प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

प्रवाशांशी सौजन्याने वागणारे व त्यांना चांगली सेवा देणारे परिवहन कर्मचारी वाहतूक नियंत्रक विनोद जावरे ,वंदना गोस्वामी, प्रेम प्रकाश बर्डे विजय वसावे, रामकृष्ण जावरे दिलीप पाडवी, डीएम शिरसाट, ए आर प्रधान, आर व्ही जावरे, व्ही आर वसावे, दीपक निंभोरे, दीपक पाडवी, आधी वाहक चालक विभाग नियंत्रक व इतर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या गौरव प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला,

उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना गौरविण्यात आले याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन यांनी मनोगत व्यक्त करताना राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे त्यांना चांगली सेवा द्यावी प्रवाशांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळते त्याच्या त्यांनी लाभ घ्यावा विशेषतः महिला वृद्ध प्रवासी यांनी यांना त्यांनी सहकार्य करावे जेणेकरून त्यांच्या प्रवास सुखकर होईल असे त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका ग्राहक पंचायतीचे सचिव शरद सूर्यवंशी यांनी केले पंडित भामरे यांनी आभार मानले कार्यक्रमास ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष कीर्ती कुमार शहा तळोदा तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष रमेश कुमार भाट तालुका यांचे सह ग्राहक पंचायत प्रवासी महासंघ सदस्य उपस्थित होते सचिव शरद सूर्यवंशी पंडित भामरे प्राध्यापक राजाराम राणे मनीष कुमार शहा पंकज तांबोळी भूषण येवले चेतन धानका उपस्थित होते .
- 0
- 0
- 0
- 0





