- विश्व आदिवासी दिनानिमित्त आई याहा मोगी फ्रेंड ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

तळोदा, दि. ८ : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- विश्व आदिवासी दिनाच्या औचित्य साधत आई याहा मोगी फ्रेंड ग्रुप, तळोदा यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत दि. ८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ते ७, मराठी शाळा, तळोदा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास आमदार राजेश पाडवी, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, डॉ. महेंद्र चव्हाण, तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, नगरसेवक कपिल कर्णकर, योगेश मराठे, नारायण ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आई याहा मोगी फ्रेंड ग्रुपचे अध्यक्ष प्रेम पाडवी यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विनोद माळी, कालूसिंग पाडवी, चेतन शर्मा, अक्षय धानका, सुनील धानका, नामदेव पाडवी, मयूर पाडवी, दीपक पाडवी, विष्णू पाडवी, दिवाण धानका, वसंत पावरा, कृष्णा धानका, गोविंदा धानका, हिरालाल पाडवी, किरण पाडवी, संजू पाडवी, लकी पाडवी, राज पाडवी, सनी पाडवी, प्रकाश जोहरी, कुशल वळवी, गोविंद पाडवी, विशाल पाडवी, निलेश पाडवी, कमलेश पाडवी, रोहन पाडवी, कुलदीप सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, रवी पावरा व राजू पावरा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मालिनी माळी, कोमल वसावे, मुख्याध्यापक सुनील बोरसे, लालसिंग खर्डे, तसेच सुशांत ठाकरे व बागल यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आल्याने या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. “शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हीच भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची खरी गुंतवणूक आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला
- 0
- 0
- 0
- 0





