आंतरराष्ट्रीय आरोग्य नंदुरबार

अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार

 

अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार

नंदुरबार/अयोध्या : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी अहोरात्र धावणाऱ्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत झालेल्या राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला ‘राष्ट्रीय सेवा रत्न – २०२६’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले.या वर्षाचा हा पाचवा राष्ट्रीय पुरस्कार व एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

राम कृष्ण सेवा फाऊंडेशन, अयोध्या यांच्या वतीने १२ व १३ सप्टेंबर रोजी या भव्य समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आकाश गुप्ता, संरक्षक राजेश चौबे आणि महासचिव विजय वर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आमदार वेद प्रकाश गुप्ता, आमदार अजय सिंह, महाराणी डॉ. मंजू सिंह, पोलीस अधीक्षक संतोष कुमार मीणा, तसेच रक्तकोष फाऊंडेशनचे राष्ट्रीय संयोजक डॉ. अनिल मामित आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचे सक्रिय सदस्य  अरुण शांतीलाल साळुंखे आणि  रामकृष्ण पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी देशभरातील १५० सेवाभावी संस्था उपस्थित होत्या. या यशात श्री छत्रपती ब्लड फाउंडेशन चे सदस्य महेंद्र झवर, जीवन माळी, अजय देवरे,हितेश कासार,पो कां अभय राजपूत, सुधीर ब्राह्मणे यांसह सर्व रक्तदात्यांचा सिंहाचा वाटा आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *