नंदुरबार

अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन

अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे
‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन

नंदुरबार, दि. 08 सप्त नगरी न्यूज ब्युरो :
ग्रामीण भागातील महिला, माता व बालकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात माता-बाल आरोग्य, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, संतुलित पोषण आहार, कुपोषण प्रतिबंध, वैयक्तिक स्वच्छता, संसर्गजन्य आजारांपासून बचाव आणि किशोरवयीन आरोग्य याबाबत उपस्थित महिला व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यात आली.

अंगणवाडी केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा योग्य वापर, बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढीचे निरीक्षण आणि दैनंदिन आरोग्याची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभाग, अंगणवाडी विभाग व स्थानिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *