नंदुरबार

कापूस उत्पादकांनी मुदतीत ‘कापूस किसान’ ॲपवर नोंदणी करावी : कृउबा सभापती तथा आमदार राजेश पाडवी हमीभावाने कापूस खरेदीसाठी उपबाजार समितीचे श्याम फायबर येथे सीसीआय केंद्र सज्ज

कापूस उत्पादकांनी मुदतीत ‘कापूस किसान’ ॲपवर नोंदणी करावी : कृउबा सभापती तथा आमदार राजेश पाडवी

हमीभावाने कापूस खरेदीसाठी बोरद येथे उपबाजार समितीचे श्याम फायबर सीसीआय  केंद्र सज्ज

तळोदा : कापूस हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेचा लाभ मिळावा, यासाठी भारतीय कापूस निगम लिमिटेडने (सीसीआय) ‘कापूस किसान’ मोबाईल ॲप सुरू केले आहे. या वर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुदतीची वाट न पाहता नोंदणी करून शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार राजेश पाडवी यांनी केले.

         तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार समिती बोरद श्याम फायबर येथे सीसीआय केंद्र शासनाचा हमी भाव केंद्र कापसाची विक्री साठी तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वच्छ व सुका कापसाची विक्रीसाठी आणावा त्यासाठी आधारभूत किमतीवर कापूस विकण्यासाठी कपास किसान या मोबाईल ॲपद्वारे स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. 

  ‘कापूस किसान’ ॲपवरील नोंदणीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कापूस विक्री करता येणार आहे. तसेच कापूस विक्री प्रक्रियेची आवश्यक माहितीही ॲपवर उपलब्ध होणार आहे. नोंदणीसाठी कापूस पिकाचा पेरा असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि पीक पाहणीची नोंद आवश्यक आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे व आवश्यक माहिती तयार ठेवावी. नोंदणी करताना तांत्रिक अडचण आल्यास सीसीआयच्या 9421010823 या व्हॉट्सप हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी मदत सुविधा कक्षातून नोंदणीबाबत मार्गदर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. ३१ ऑक्टोबरनंतर नोंदणीची संधी आहे त्यामुळे हमीभावाने कापूस विक्रीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृउबास सभापती तथा आमदार राजेश पाडवी यांनी केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *