नंदुरबार

तळोद्यात राणी दुर्गावती जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा                                  महिला बचत गट व लाभार्थीना अनुदान वाटप, रानभाजी महोत्सव, आरोग्य तपासणी, विविध दाखले वाटप

तळोदा येथे राणी दुर्गावती जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा,उत्साहात संपन्न…

महिला बचत गट व लाभार्थीना अनुदान वाटप..

आरोग्य तपासणी, विविध दाखले वाटप, रानभाजी महोत्सव

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो :-

तळोदा येथीलआदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधत तसेच विरांगना राणी दुर्गावती जयंती निमित्त राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा , राजभाजी महोत्सव, महिला बचत गटांना व लाभार्थींना अनुदान वाटप आरोग्य तपासणी शिबिर विविध दाखले प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम तळोदा येथील प्रकल्प कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्यादादा पाडवी तसेच शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा पाडवी उपस्थित होते.

यावेळी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तळोदा नगराध्यक्ष भाग्यश्रीताई चौधरी, अक्कलकुवा सरपंच उषाताई बोहरा, निता माळी नगरसेवक रामानंद ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात विरांगना राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिलांच्या सशक्तीकरण, आत्मनिर्भरतेसह विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी महिलांनी संघटित राहून स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले.

महिला बचत गटांना आर्थिक साहाय्य मान्यवरांचा हस्ते वाटप करण्यात आले. तसेच रेशन कार्ड, आधार अपडेट, विविध दाखले प्रमाणपत्र काढून वाटप केले. आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात आली.

कृषी विभागातर्फे कृषी योजना माहिती दिली. रानभाजी महोत्सवात महिला बचत गटाचे स्वयंरोजगारातून उत्पादित वस्तू, भगर, दाळ मशरूम व रान भाज्यांचे स्टॉल , विविध शाळा स्टॉल लावण्यात आले होते.

याप्रसंगी आमदार आमश्यादादा पाडवी, आमदार राजेशदादा पाडवी, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्रकल्प अधिकारी लघिमा तिवारी, यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने महिला बचत गट व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *