नंदुरबार

तळोदा श्री बडादादा फाउंडेशन व श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळच्या वतीने शनेश्वर जयंतीनिमित्त पाणपोईचे शुभारंभ

तळोदा श्री बडादादा फाउंडेशन व श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळच्या वतीने शनेश्वर जयंतीनिमित्त पाणपोईचे शुभारंभ

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-श्री शनेश्वर जयंतीचे औचित्य साधून येथे एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन शनिगल्ली येथील श्री बडादादा फाउंडेशन व श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
                        

             याप्रसंगी किरण पाटील, गोकुळ मिस्तरी, विनोद वंजारी, विपुल कुलकर्णी, गोलू दातीर, रोहन कलाल, सुयोग पाटील,नयन पाटील ,निखिल गुरव, स्वामी गुरव, कोहिनूर दातीर, गणेश कलाल, टिनु गुरव यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व बडादादा फाउंडेशन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढत्या उन्हाळ्याचा आणि कडक तापमानाचा विचार करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
      कार्यक्रमा दरम्यान किरण पाटील यांनी सध्याच्या वाढत्या जागतिक तापमानाबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांनी उन्हापासून स्वतःचे रक्षण कसे करावे, जास्तीत जास्त पाणी पिऊन हायड्रेटेड कसे राहावे आणि पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणे किती गरजेचे आहे, याबद्दल मोलाची माहिती दिली. या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि.सुयोग पाटील यांनी केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *