नंदुरबार

भगवान महावीर यांनी “जियो और जीने दो” चा संदेश मानव जातीला दिला प्रा. पूजा जैन यांचे प्रतिपादनभगवान महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक वितरण..

भगवान महावीर यांनी “जियो और जीने दो” चा संदेश मानव जातीला दिला प्रा. पूजा जैन यांचे प्रतिपादन
भगवान महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक वितरण..

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील एम थ्री इंटरनॅशनल एज्युकेशन अकॅडमी या स्कूलमध्ये भारतीय जैन संघटना व एम थ्री इंटरनॅशनल एज्युकेशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव च्या पूर्वसंध्येला चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

                         या स्पर्धेत तीस स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला यातील यशस्वी स्पर्धक प्रथम ईश्वरी विलास कवाळे, द्वितीय कणक ललित कुमार सूर्यवंशी तृतीय फाल्गुन मयूर कुमार सूर्यवंशी यांना पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले तसेच या स्पर्धेत सहभागी सर्व 30 विद्यार्थी विद्यार्थिनींना उत्तेजना पर पारितोषिक म्हणून डिजिटल स्लेट देण्यात आले.

         याप्रसंगी प्रा. पूजा जैन यांनी भगवान महावीर यांच्या जीवनातील विविध पेलूचे विद्यार्थी विद्यार्थिनींना दर्शन घडविले. त्या म्हणाल्या 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी जीवन जगण्याच्या सर्वात सरळ सोपा मार्ग दाखविला त्यांनी जीवन जगण्याची प्रमुख पाच सूत्रे सांगितली सत्य अहिंसेच्या मार्ग त्यांनी जगाला दिला आजच्या जगातील परिस्थितीच्या त्यांनी जगाला दाखवलेला अहिंसाच्या मार्ग हाच मानव जातीला तारू शकतो असेही त्यांनी

          याप्रसंगी बोलताना सांगितले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून एम थ्री इंटरनॅशनल एज्युकेशन अकॅडमी चे अध्यक्ष दिग्विजय माळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड अल्पेश जैन,प्रा. पूजा जैन, शहर उपाध्यक्ष आशिष जैन ,जिल्हा सदस्य दीपेश जैन ,प्रेम जैन, कुशल जैन राहुल जैन, रमेश कुमार भाट, नितीन पाटील ,हर्षदा सोनार, चेतना पवार, सोनाली मराठे, भूषण सूर्यवंशी यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार शिक्षिका हर्षदा सोनार यांनी मानले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *