नंदुरबार

‘तेजस्विनी कृषी संस्कृती २०२६’ भव्य प्रदर्शनीचा उत्साहात समारोप !

‘तेजस्विनी कृषी संस्कृती २०२६’ भव्य प्रदर्शनीचा उत्साहात समारोप !


नंदुरबार | दि. : 23 मार्च

महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तेजस्विनी कृषी संस्कृती २०२६’ या भव्य प्रदर्शनीचा समारोप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

७२ महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग
या प्रदर्शनीत एकूण 72 महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली उत्पादने, कौशल्य आणि उद्यमशीलता प्रभावीपणे सादर केली. दीपप्रज्वलन व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

मान्यवरांची उपस्थिती
समारोप कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, प्रकल्प संचालक दीपक पटेल (ATMA), कांतागौरी बनकर (माविम), विजय पाटील (कृषी विभाग) तसेच जयश्री सपकाळ (CYDA) उपस्थित होते.

विजेत्यांचा गौरव
कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
  फॅशन शो विजेते : नीता पाडवी, दुर्गा वळवी, रंजना पाडवी
तेजस्विनी विशेष कामगिरी पुरस्कार : हेंगाते संस्था (कोठली), नीलू शिरसाठ, सीमा चौरे, राजहंस दूध केंद्र, सातपुडा निसर्ग गट (तोरणमाळ) यांसह इतर मान्यवर. उत्कृष्ट स्टॉल पुरस्कार : सविता परमार, मंजुषा रघुवंशी, प्रतिभा पवार

महिलांच्या उद्यमशीलतेचे कौतुक
प्रास्ताविकात मागील तीन दिवसांचा आढावा सादर करण्यात आला. यानंतर मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी महिला बचत गटांच्या उद्यमशीलतेचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा महोत्सव महिला सक्षमीकरण, कृषी आधारित उद्योजकता आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
.
.
.

Tejaswini2026 #WomenEmpowerment #SHG #Agriculture #ATMA #MAVIM #Nandurbar #RuralEntrepreneurship #SelfHelpGroups #VocalForLocal

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *