आरोग्य नंदुरबार

शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी

शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी

नंदुरबार, दि. 25 जून :
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार) आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदूरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या समुदाय आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ७० हून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

शासकीय विश्रामगृह, शहादा येथे मंगळवार, दिनांक २३ जून २०२६ रोजी या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान एकूण ७१ रुग्णांची बीपी (रक्तदाब), शुगर (मधुमेह), नेत्र तसेच जनरल तपासणी करण्यात आली. यासोबतच ३९ रुग्णांचे रक्त नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले. आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी व नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमूख रामेश्वरभाऊ नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या शिबिराच्या ठिकाणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गिरीष पाटील, निलेश पाटील, माधुरी पालवे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, रुख्मिणी हॉस्पीटल (शहादा), जगदीश हॉस्पीटल (शहादा) आणि कांतालक्ष्मी शहा डोळ्यांचे हॉस्पीटल (नंदुरबार) यांचे अनमोल सहकार्य लाभले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार सुधाकर धामणे यांनी शिबिराच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *