नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती साजरी

तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

                        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. आर. डी. मोरे हे होते. तर प्रमुख प्रा. एल. एन. पाटील, प्रा. के. एम. शिंदे,  मनिष कलाल, पवन शेलकर,  जितेंद्र चौधरी,  योगेश महाजन,  महेंद्र सामुद्रे व विद्यार्थी उपस्थित होते.       

               याप्रसंगी मागील वर्षी विद्यापीठाद्वारा “सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी” या पुरस्काराने सन्मानित महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. पारबती अजित पावरा या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. स्वप्निल वाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत दलाल,  शिवदास प्रधान, विष्णू पाडवी यांचे सहकार्य लाभले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *