नंदुरबार

भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार सीईओ नमन गोयल यांच्या हस्ते वितरण

भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार

नंदुरबार / सप्त नगरी न्युज:
ग्रामविकासाच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामपंचायत भुजगावला ॲग्रोवल्डतर्फे दिला जाणारा ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत राज्यस्तरीय पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. हा सन्मान 3 जानेवारी रोजी आयोजित ॲग्रोवल्ड कृषी प्रदर्शनात प्रदान करण्यात आला.

           ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अर्जुन पावरा, उपसरपंच कविता पावरा, रोजगारसेवक सुभाष पावरा, राकेश पावरा, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप पाडवी, शंकर भिल व प्रमोद पावरा रविंद्र पावरा यांनी पुरस्कार स्वीकारला.

हा पुरस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भुजगाव ग्रामपंचायतीने स्वच्छता, रोजगारनिर्मिती, कृषीपूरक उपक्रम, पायाभूत सुविधा व नागरिकांच्या सहभागातून राबविलेल्या विकासात्मक योजनांमुळे राज्यस्तरीय पातळीवर विशेष ठसा उमटविला आहे.

या यशाबद्दल ग्रामस्थ, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यातही भुजगाव ग्रामपंचायत विकासाच्या दिशेने आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *