
तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा तालुक्यातील नर्मदानगर येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव नर्मदा नगरात आयोजित करण्यात आले.

दि. 2 रोजी शिबिराचे उद्घाटन राजेंद्र माळी व उदय सूर्यवंशी (माजी सैनिक) यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालय कार्यकारणीचे अध्यक्ष भरत माळी हे होते. उद्घाटन प्रसंगी रोहित सूर्यवंशी, उपाध्यक्ष, अरविंद माळी, उखा पिंपरे, महाविद्यालय कार्यक्रमाचे सदस्य, प्राचार्य व सचिव डॉ. हेमंत दलाल, जि. प. शाळा नर्मदा नगर येथील मुख्याध्यापक वालजी घटी व गावाचे प्रथम नागरिक पुण्या वसावे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. पराग तट्टे यांनी सात दिवसात कोणते व कशा प्रकारचे कार्यक्रम नियोजन त्याचा उद्देश काय आहे हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.गौतम मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिता गायकवाड यांनी केले. प्राचार्य डॉ.दलाल यांनी विद्यार्थ्यांनी शिबिरात कसे, कोणत्या पद्धतीने राहावे व शिस्तीचे पालन करावे असे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले.
- 0
- 0
- 0
- 0





