नंदुरबार

नेमसुशिल समूहात पोलीस प्रशासन मार्फत मार्गदर्शन शिबीर व प्रतिज्ञा

तळोदा / सप्त नगरी न्युज
तळोदा- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे  यांच्या मार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले त्यात बाल गुन्हेगारी, ऑनलाईन चिटिंग, मांजा प्रतिबंध, सायबर क्राईम इत्यादी विषयावर संबोधन करण्यात आले प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया, हवालदार विजय सोनवणे,
पोलीस नाईक अनिल पाडवी, मुख्याध्यापिका पुष्पा बागुल यांची उपस्थिती होती.
यावेळी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करावा विशेषतः मुलींनी काळजी घ्यावी अनोळखी लिंक ओपन करू नये तसेच मुलांनी देखील पतंगोत्सव काळात नायलॉन मांजा वापर करू नये वापर आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले. प्रसंगी नायलॉन मांजा प्रतिबंध बद्दल विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा घेण्यातआली.
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका- शिक्षकेत्तर कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुण कुवर यांनी मानले.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *