
तळोदा येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन

तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो
तळोदा येथील प्रज्ञासूर्य फाउंडेशन व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेविका जयश्री महाले होते.
सुरुवातीला रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर कार्यक्रमात रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर पुष्पा ब्राह्मणे व सुजाता साळवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडण्यामागे रमाई आंबेडकर यांच्या मोठा त्याग व समर्पण आहे. त्यांच्या त्यागामुळे आज समाजातील स्त्रिया सन्मानाने जीवन जगत आहेत. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांनी कुटुंबाकडे लक्ष देऊन बाबासाहेबांची कमी कुटुंबाला जाणू दिले नाही. याबाबत बाबासाहेबांनी देखील रमाई आंबेडकर यांच्या बद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तना मागे रमाई आंबेडकर यांचा मोठा पाठबळ असल्याचे सांगून त्यांच्याबद्दल देखील नेहमीच कृतज्ञता व्यक्त करून त्यांची जयंती व्यापक स्वरूपात पुढच्या वर्षापासून साजरा करण्याचा निर्धार बोलून दाखवला.
प्रतिमापूजनानंतर सामूहिक बुद्ध वंदना, त्रिशरण,पंचशील घेण्यात आले.कल्पना बोरसे, विद्या नागमल , गीता गाडे, तक्षशिला पिंपळे, मीनाक्षी महिरे, प्रियंका पवार , सुनिता बागले, मंगला आगळे,सुरेखा गवळे,निकिता बोरसे आदीसह महिला वर्गाची उपस्थिती होती.
.
- 0
- 0
- 0
- 0





