
नवापूर येथे मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामसंवाद सभा संपन्न
नवापूर |सप्त नगरी न्युज ब्युरो
नवापूर येथे मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामसंवाद सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये तालुक्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसंवाद सभेदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणी, समस्या व स्थानिक गरजा याबाबत मा. अंजली शर्मा यांनी सविस्तर माहिती घेतली. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील मुद्द्यांवर थेट संवाद साधत समस्यांच्या त्वरित निराकरणासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या ग्रामसंवाद सभेमुळे प्रशासन व नागरिकांमधील थेट संवाद अधिक दृढ झाला असून, स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत समन्वयातून उपाययोजना राबविण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
(Collector Office Nandurbar)
GramSamvad #SDMVisit #PublicInteraction
- 0
- 0
- 0
- 0





