
नेमसुशिल समूहातील क्रीडा शिक्षक सी जी वळवी राष्ट्रीय खो- खो पंच परीक्षेत उत्तीर्ण
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
तळोदा येथील नेमसुशिल शैक्षणिक समूहातील क्रीडा शिक्षक सी. जी. वळवी यांची राष्ट्रीय खो-खो परीक्षक पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल विशेष कौतुकास्पद अभिनंदन करण्यात आले.
याआधी देखील सी. जी. वळवी यांनी जिल्हा विभाग स्तरावर विविध स्पर्धांचे पंच म्हणून काम पाहिले आहे. सी. जी. वळवी यांच्या राष्ट्रीय यश निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखीलभाई तुरखीया, संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी एम महाले, सचिव संजयभाई पटेल, समनव्यक हर्षिलभाई तुरखीया, मुख्या. सुनील परदेशी, मुख्या. श्रीमती भावना डोंगरे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.
- 0
- 0
- 0
- 0





