
शहादा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

शहादा, दि. २६ जून : गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शहादा तालुका कार्यकारिणीची निवड बैठक द्वारकाधीश मंदिर, पिंगाणे (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

बैठकीस संस्थापक सदस्या ॲड. सौ. दीपमाला ताई पाटील, विभागीय प्रमुख सुखदेव लोटन पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष गौतम खर्डे, माजी राज्य सरचिटणीस पुरुषोत्तम भाई ,माजी जिल्हा कार्याध्यक्ष गजेंद्र गिरी गोसावी,माजी शहादा तालुकाध्यक्ष दीपक भाई , माजी सचिव सखाराम शिंदे ,धनराज पानपाटील जिल्हा सदस्य तसेच शहादा तालुक्यातील ज्येष्ठ व विविध गावांतील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व उपस्थितांच्या एकमताने शहादा तालुक्याची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली:

तालुकाध्यक्ष रवींद्र गंभीर पवार (ब्राह्मणपुरी), तालुका उपाध्यक्ष दिनेश शिवाजी पाटील (अनरद),
तालुका उपाध्यक्ष मोग्या पन्नालाल पाडवी (टवळाई), सचिव न्हानकू सदू मुसळदे (होळ मोहिदा), सहसचिव वाल्मीक काशिनाथ दाभाडे (हिंगणी),

सहसचिव मोहन सिंगार रावताडे (तलावडी), कार्याध्यक्ष मुकेश कैलास गवळे (मोहिदे), कार्याध्यक्ष योगेश विठोबा तळवे (खेड दिगर), कार्याध्यक्ष भूषण गोकुळ वंजारी (कुकावल),
खजिनदार मंगल रायसिंग ठाकरे (तीखोरा), प्रसिद्धीप्रमुख सुभाष नागो भील (मंदाने), सदस्य सचिन नारसिंग पवार (सुलवाडा), नितीन रतिलाल पाटील (कौठळ), भरत करणसिंग चव्हाण (कुडावद), आदींची निवड करण्यात आली.

महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुदर्शन वसंतराव बोरसे, सौ. विजयाबाई प्रताप चव्हाण, सुरेखाबाई शरद कुवर, सौ. वैशाली भगवान पाटील, सौ. रेणुकाबाई खंडोबा ठाकरे, सौ. रेखाबाई मोग्या पाडवी यांची निवड केली.

यावेळी सारंखेडा, म्हसावद व शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेची बांधिलकी अधिक मजबूत करून पोलीस पाटील यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
- 0
- 0
- 0
- 0





