विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत नंदुरबार येथे कार्यशाळेतून लाभार्थ्यांना मार्गदर्शन

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो :-शासनातर्फे बारा बलुतेदार पद्धतीनुसार पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यशाळेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात आयोजित कार्य शाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना आशा सिंघवी म्हणाल्या कि, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना असून विश्वकर्मा कौशल्य विकास योजना महत्वपूर्ण असून लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन संघवी यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर यांनी सांगितले की, व्यवसाय करताना कर्ज पुरवठा व्यवसाय यशस्वीतेसाठी ग्राहकांना दर्जेदार आणि योग्य किमतीत वस्तू देणे महत्त्वाचे ठरते. बारा बलुतेदारांचे व्यवसाय पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. विविध योजना अंतर्गत पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेच्या समावेश असून आर्थिक सहाय्यासाठी बँका सदैव तत्पर असल्याचे पैठणकर यांनी सांगितले. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना एमएसएमई मंत्रालयाचे डेप्युटी डायरेक्टर प्रफुल्ल उमरे यांच्या समन्वयाने कार्यशाळा झाली.

याप्रसंगी उमरे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अपडेट राहणे गरजेचे आहे. उत्पादित माल आणि बाजार पेठेतील
मागणीनुसार पुरवठा, डिजिटल मार्केटिंग, क्यूआर कोड स्कॅन करणे आणि पॅकेजिंग बाबत मार्गदर्शन केले.
मुंबई येथील विश्वकर्मा योजनेचे प्रतिनिधी हिमांशू सराटे यांनी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
एक दिवसीय कार्यशाळेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वकांक्षी योजना, प्रकल्प,
डिजिटल मार्केटिंग, या कृत्रिम बुद्धिमत्ता यासह अनेक विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना तसेच नंदुरबार जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीते साठी राजेश गवांदे, कनिष्ठ सहाय्यक निलेश बोरसे, मधुक्षेत्रीक दक्षता चव्हाण, वसंत गावित यांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





