राजमाता जिजाऊ नवीन बसचा लोकार्पण सोहळा नंदुरबार आगार येथे उत्साहात
नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभाग अंतर्गत नंदुरबार आगारात राजमाता जिजाऊ नवीन पाच बसेस बुधवारी दाखल झाल्या. या पाचही बसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
नंदुरबार नगर पालिकेच्या नगराध्यक्षा रत्न रघुवंशी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊची प्रतिमा आणि बसचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

फटाक्यांची आतिष बाजी आणि ढोल ताशांच्या गजरात शानदार लोकार्पण सोहळा झाला.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ यांच्या नावाने दाखल झालेल्या नवीन बसेस सर्व सुविधायुक्त असून प्रवाशांनी या बसमधून प्रवास करण्याचे आवाहन केले. धुळ्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेचा आढावा मांडला. तर नंदुरबार आगार प्रमुख सुनिल महाले यांनी राजमाता जिजाऊ नवीन बस आणि इतर सुविधांबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, काही दिवसां पूर्वी प्रवासी महासंघातर्फे नंदुरबार आगारात राजमाता जिजाऊ बस उपलब्ध होणे बाबत मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले.
राजमाता जिजाऊ नवीन बस लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकुवा आगार प्रमुख अहिरराव, नंदुरबार नगर पालिकेच्या नगर सेविका सोनिया राजपूत, वैष्णवी राजपूत, मनकुवर गिरासे, मनीषा वळवी, रेखा चौधरी, वंदना अहिरे, वंदना साळुंके, श्रीमती कुरेशी , प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, सामाजिक कार्यकर्ते मोहित राजपूत, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी आडगे यांनी केले. आभार दिनेश गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन आगार प्रमुख सुनिल महाले, स्थानक प्रमुख आर. एस. जगताप, वाहतूक निरीक्षक
ऋषिकेश पावरा, देवेंद्र गिरासे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक
देवेंद्र सूर्यवंशी, प्रशांत गुजराती, दिलीप गायकवाड, विशाल साळुंके, यश कोकणी, विपुल सोनवणे, प्रकाश बागुल, शरद पवार,प्रल्हाद राठोड, लतिका खन्ना, सुवर्ण धनगर,हिराबाई ठाकरे, मनीषा शेवाळे, ज्योती साळी, चालक वाहक आणि कार्य शाळा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बसमधून शहरात फेरफटका मारण्याचा मान्यवरांनी घेतला आनंद…
लोकार्पण सोहळ्या नंतर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी आणि सर्व नगरसेविका तसेच प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, नंदुरबार आगार प्रमुख सुनिल महाले, धुळे वरिष्ठ आगार प्रमुख संदीप निकम, अधिकारीव कर्मचाऱ्यांनी नवीन बस मधून शहरातील प्रमुख मार्गावरून फेरफटका मारत प्रवासाचा आनंद घेतला.
- 0
- 0
- 0
- 0





