नंदुरबार

चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात साजरा

चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात साजरा
नंदुरबार | दि. 22 जानेवारी सप्त नगरी न्युज ब्युरो

नंदुरबार क्रीडा संकुल येथे जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव दिनांक 22 व 23 जानेवारी 2026 रोजी दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

       दिनांक 22 जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. हा कार्यक्रम पूर्णतः बालकांसाठी असल्याने, उद्घाटनप्रसंगी रुखमाबाई बालिकाश्रम, सोरापाडा येथील बालिका आंचल वसावे हिच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
                   जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सहभागी सर्व बालकांना मार्गदर्शन करताना, आत्मविश्वास, खेळभावना आणि सर्जनशीलता जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित करून शुभेच्छा दिल्या.

                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले. उद्घाटनप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके, परिवीक्षा अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा संरक्षण अधिकारी भरत राणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, केंद्र व्यवस्थापक ज्योती पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

          जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमधील बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, खेळांची आवड निर्माण करणे व सांघिक भावना विकसित करणे या उद्देशाने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
             यंदा धावणे, उंच उडी, लांब उडी, खो-खो, रस्सीखेच, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, गीत गायन, नृत्यकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून 16 शाळांमधील सुमारे 563 बालकांनी सहभाग नोंदविला आहे.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश शिंदे यांनी केले तर आभार गौतम वाघ यांनी मानले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बालविकास विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
.
.
.

ChachaNehruBalMahotsav #Nandurbar #ChildDevelopment #BalSanskar #WomenAndChildDevelopment #SportsAndCulture #DrMittaliSethi #DistrictAdministration

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *