
कोकणीहिल, नंदुरबार येथे रमाई जयंती साजरा
कोकणीहिल, नंदुरबार येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. व रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
नटखट प्ले स्कुलच्या संचालिका संगिता वाघ यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. रमाबाई यांचे प्रतिमा पूजन, बुध्द वंदना, खीरदान, गीत गायन करून रमाबाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर सरिता सरकटे, मीना बाविस्कर, प्रिती वाघ, मालती मोहिते, उषा वाघ, रुपाली मोरे, सोनल आगळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा तायडे, सपना भामरे, कल्याणी म्हसदे, सपना पवार यांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





