महाराष्ट्र मुंबई शहर

मुंबईतील ८८ लोकल गाड्या तीन महिन्यांसाठी राहणार बंद

मुंबईतील ८८ लोकल गाड्या तीन महिन्यांसाठी राहणार बंद

मुंबई|सप्त नगरी न्यूज ब्युरो

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पुढील तीन महिने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार असून गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची लोकल रेल्वे सेवा स्थगित करण्यात येणार आहे.
             मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पुढील तीन महिने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार असून गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची लोकल रेल्वे सेवा स्थगित करण्यात येणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम ८८ दैनंदिन लोकल गाड्यांवर होणार असून याबाबतचे नियोजन सुरू असून लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.

पश्चिम रेल्वेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुनर्विकासाचे काम सुरू आहे. वांद्रे आणि खारदरम्यानचा जुना रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. हा पूल मुंबई सेंट्रल आणि बोरिवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवणे, गर्दी कमी करणे आणि भविष्यात प्रवाशांना अधिक चांगली सेवा देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल सेवा विस्कळीत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर ते जानेवारीदरम्यान कांदिवली ते बोरिवली सेक्शनमधील पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या बांधकामादरम्यान दररोज २०० ते २५० लोकल गाड्या रद्द करण्यात येत होत्या. आता तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर हे काम गोरेगाव ते सीएसएमटी विभागाकडे वळवण्यात आले असून हा भाग तांत्रिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक मानला जात आहे.

दरम्यान, प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला असून वांद्रे ते सीएसएमटीदरम्यान लोकल ट्रेन सेवा सुरू राहणार आहे. तसेच वांद्रे आणि बोरिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम आधीच पूर्ण झाल्याने या विभागातील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. पश्चिम रेल्वेच्या या विस्तार प्रकल्पावर अंदाजे ९६४.८४ कोटी रुपयांचा खर्च होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असून भविष्यात प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी आणि सुविधा मिळणार आहेत.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *