
बीडच्या अंबाजोगाईमध्ये तीन हजार प्लास्टिक बाटल्यांचा साकारला अनोखा मनोरा
बीड|सप्त नगरी न्यूज ब्युरो
अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आपल्या घरातील प्लास्टीक बाटल्या जमा करून त्या बाटल्यांचा मनोरा तयार केला.
अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आपल्या घरातील प्लास्टीक बाटल्या जमा करून त्या बाटल्यांचा मनोरा तयार केला. या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत पृथ्वी प्लास्टीक मुक्त करण्याच्या उपक्रम कृतीतून साकारला. स्नेहसंमेलना निमित्ताने जिल्ह्यात प्रथमच हा नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी प्लॉस्टिक संकलन ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद घेऊन सहभाग नोंदवला. या निमित्तानेतीन हजार प्लॉस्टीक बाटल्यांचे संकलन करून आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्याची संकल्पना माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगांवकर यांनी मांडली. ती प्रत्यक्षात कला शिक्षक उमेश डोंगे यांनी साकारली. आकर्षक व पर्यावरणाला संदेश
देणारा सेल्फी पॉईंट उभारला. त्यांच्या बरोबर पर्यावरण पुरक असा संदेश देणारे फलकही दाखविण्यात आला. या सेल्फी पॉईंटला येऊन फोटो काढण्यासाठी पालक, विद्यार्थी व समाजातील नागरीकांची एकच झुंबड उडाली होती. या सेल्फी पॉईंटचे
अनावरण अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश मुडेगांवकर, मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे, पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे, पर्यवेक्षिका रूपाली मुळे, सतीश वांगे, सहप्रमुख उमेश डोंगे, विद्यार्थी प्रतिनिधी स्वराली महाजन, ऋत्विक कुलकर्णी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनंतराम कोपले, शैलेंद्र कंगळे, पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे, रूपाली मुळे, श्रीकांत देशपांडे, ज्योती शिंदे, स्नेहसंमेलन प्रमुख सतीश वांगे, सहप्रमुख उमेश डोंगे, पर्यावरण उपक्रम प्रमुख प्रमोद शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





