नंदुरबार

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे गुरुवारी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे
अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे गुरुवारी नंदुरबार जिल्हा दौऱ्याव

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश स. शेटे हे गुरुवार, दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) तसेच राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित बैठकीत 1 जुलै 2024 पासून एकत्रितपणे राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीचा, तसेच आयुष्मान भारत कार्ड वितरणाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संबंधित अधिकारी, सर्व मान्यताप्राप्त रुग्णालयांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *