
महाशिवरात्री निमित्त बेल रोपांचे मोफत वाटप; पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प

महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने वृक्ष, वने व वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या मार्फत दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात बेल प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर व अक्कलकुवा येथे मोठ्या प्रमाणावर रोपांचे वितरण करण्यात आले. ग्रामस्थ, महिला व शेतकरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती अपर्णा पाटील, वनक्षेत्रपाल श्री. रामकृष्ण लामगे, श्रीमती स्नेहल अवसरमल, श्री. अरुण माळके तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षलागवड ही केवळ धार्मिक परंपरा नसून पर्यावरण संतुलनासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाचा संकल्प अधिक दृढ झाला असून ग्रामस्थांनी बेल रोपांची निगा राखण्याची व परिसर हिरवागार करण्याची प्रतिज्ञा केली.

महाशिवरात्रीसारख्या धार्मिक सणातून पर्यावरणपूरक संदेश देत सामाजिक वनीकरण विभागाने समाजामध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण केली आहे.

collectorofficenandurbar #Mahashivratri #TreePlantation #SocialForestry
- 0
- 0
- 0
- 0





