
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आंदोलकांचा शेतकरी योद्धा म्हणून सन्मान
नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो अखिल भारतीय किसान सभा च्यावतीने शेतकरी आंदोलनात सहभाग व योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतकरी योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील सात शेतकरी आंदोलकांचा सन्मान करण्यात आला.
दि. 17 रोजी आदर्श विद्यालय चेंबूर याठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात सहभाग घेतलेल्या किंवा योगदान दिलेल्या शेतकरी योद्धांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील कॉ. अनिल ठाकरे, कॉ. सुनिल गायकवाड, कॉ. बहादूर पाडवी, कॉ. राजकिरण पाडवी, कॉ. संदीप वळवी, कॉ. विकास ठाकरे आणि कॉ. सतीश पाडवी यांचा माजी खासदार व त्रिपुरा राज्याचे विरोधी पक्षनेता व माजी आदिवासी विकास मंत्री कॉ. जितेंद्र चौधरी ( त्रिपुरा ), पक्षाचे राजस्थान मधील सीकरचे खासदार कॉ. अमरा राम आणि पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते शेतकरी योद्धा म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले.
- 0
- 0
- 0
- 0





