नंदुरबार पर्यटन महाराष्ट्र

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला
‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

नंदुरबार, दि. 17 फेब्रूवारी (जिमाका वृत्त) :
तोरणमाळ महोत्सवा’च्या नियोजनासाठी जिल्ह्यातील विविध विभागांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत, त्यावर विभागांना केलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आढावा घेतला.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवारीया, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, जिल्हा शल्य चिकित्सक विनय सोनवणे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे, आदि विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

तोणरमाळ पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी 20 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत तीन दिवसीय ‘तोरणमाळ महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. सेठी या विविध विभागांचा आढावा घेतांना म्हणाल्या, महोत्सवासाठी पर्यटकांना ने-आण करणाऱ्या एस.टी. बसेस तसेच खाजगी वाहने ही चांगल्या घ्याव्यात व त्यांची योग्य तपासणी करण्यात यावी. तोरणमाळ रस्त्यावरील अपघात स्थळांची संबंधितांना पाहणी करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. वन विभागाने त्यांच्या निकषानुसार जागोजागी तपासणी पथकांची नेमणूक करावी. टाईलेट मोबाईल, अग्नीशाकम व्यवस्था रुग्णवाहीका, मोबाईल नेटवर्क 3 दिवस नियमित राहील राहील याची दक्षता घ्यावी. शेतकरी स्टॉल, बचत गटांचे स्टॉल महोत्सवात लावण्यात यावे. नुकत्याच झालेल्या तोरणमाळ यात्रेनिमित्त परिसरात पडलेल्या कचऱ्याचे निकषानुसार योग्य विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा. तसेच महोत्सवानंतर होणाऱ्या कचऱ्याचे विल्हेवाट त्वरीत लावण्यासाठी संबंधितांनी पूर्व नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या.

वापराच्या पाण्यासाठी 2 टॅकर व पिण्याच्या पाण्यासाठी जार, प्रादेशिक परिवहन विभागाचे 2 फिरते पथक, अग्नीशामक व्यवस्था, 3 रुग्णवाहीका तसेच विद्युत व्यवस्था यांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे संबंधित विभागांनी यावेळी सांगितले. राणीपूरपर्यंत बसेस व राणीपूर पासून तोरणमाळपर्यंत टॅक्सीची व्यवस्था करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

सर्व विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी आपआपल्या जबाबदाऱ्या योग्य पार पाडून ‘तोरणमाळ महोत्सव’ यशस्वी करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी यावेळी केले

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *