नंदुरबार

दोडे गुजर समाजातर्फे गुणवंतांचा गौरव, प्रतिभावानांचा सन्मान सोहळा

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो
महाराष्ट्र व गुजरात राज्यातील दोडे गुजर समाज पंच कमेटीतर्फे नंदुरबार व तापी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच समाजातील प्रतिभावान समाजबंधू-भगिनींच्या सन्मानाचा सोहळा नुकताच बाळदा ता. कुकरमुंडा येथे पार पडला.

                      कार्यक्रम समाजाचे अध्यक्ष बापूभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याबाबत सखोल विचारविनिमय करण्यात आला.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत व्हावी, समाजातील ऐक्य वृध्दिंगत व्हावे, या हेतूने सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
                     

यावेळी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी अध्यक्ष वसंत पाटील, डायाभाई चौधरी, यशवंत पाटील, निवृत्त वरिष्ठ पोलीस उपायुक्त मुकुटलाल पाटील, कन्हैया पाटील, कृष्णदास पाटील, नटवर पाटील, हिंमत पाटील, संजीव चौधरी, भावेश पाटील, प्रशांत पाटील, सुनिल पाटील, गोविंद पाटील, मिनल पाटील, भरत पाटील, मोहन पाटील यांच्यासह समाजातील मान्यवर, पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांतीलाल पाटील यांनी तर आभार मोहन पाटील यांनी मानले.

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *