नंदुरबार

नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा बाप्पा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न शिवराज्याभिषेकाचा सजीव देखावा ठरला आकर्षण; संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट लक्षवेधी

­

  • नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा बाप्पा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न
    शिवराज्याभिषेकाचा सजीव देखावा ठरला आकर्षण; संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट लक्षवेधी

तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-  येथील नेमसुशिल शैक्षणिक समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवराज्याभिषेक’ हा सजीव देखावा सादर करण्यात आली.


या सजीव देखाव्यात १०० हून अधिक विद्यार्थी व कलाकारांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, स्वराज्याची संकल्पना, महाराष्ट्राची संस्कृती तसेच विविध ऐतिहासिक प्रसंग नाट्य व नृत्य रूपाने सादर करण्यात आले.


संत तुकाराम महाराज व शिवरायांची भेट ठरली विशेष आकर्षण या सजीव देखाव्यातील संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट हा प्रसंग उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला.

संत तुकाराम महाराजांचे आध्यात्मिक विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यनिष्ठा यांचा सुंदर संगम विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे साकारला. या प्रसंगाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, मौलाना यांसह विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखा विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे साकारल्या. शिक्षकांनीही विविध भूमिकांमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांना साथ दिली. शिक्षकांचा सहभाग आणि सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले.

ढोल-ताशांचा गजर, संबळाचा निनाद, भगवे ध्वज आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.


नेमसुशिल शैक्षणिक समूहाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती, भक्ती आणि कलात्मक अभिव्यक्तीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.


विसर्जन सोहळा प्रसंगी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी सौ नेहाताई संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया इंजि.वतनकुमार मगरे साहेब सचिव संजयभाई पटेल संस्था समन्वयक व मोती बँक अध्यक्ष हर्षिलभाई तुरखिया मॅनेजर वसंत पाटील गौरव वाणी प्रसाद सोनार निषादभाई माळी तसेच शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. नृत्य दिग्दर्शन शरद सावळे यांनी तर ढोल पथक दिग्दर्शन गणेश बत्तीसे यांनी केले.


सोहळ्याच्या यशस्वितेसाठी नेमसुशिल परिवारातील मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल मुख्या. सुनिल परदेशी प्रिन्सिपल पी डी शिंपी मुख्या. भावना डोंगरे मुख्या गणेश बेलेकर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोती बँक कर्मचारी व विद्यार्थी आणि पालकांनी परिश्रम घेतले.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *