नंदुरबार

नवापूर लोकनियुक्त नगराध्यक्ष सह मान्यवरांची विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

नवापूर /सप्त नगरी न्युज ब्युरो

नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावीत, लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव, गटनेते नरेंद्र नगराळे तसेच २० नगरसेवकांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. विकास कामांवर चर्चा केली.

नवापूर नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे यश आले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी उपमुख्यमंत्री तथा  राष्ट्रवादीचे नेते यांची सदिच्छा भेट घेतली याप्रसंगी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावीत, नगराध्यक्ष जयवंत जाधव, गटनेते नरेंद्र नगराळे व नगरसेवकांनी सत्कार केला. त्यानंतर नवापूर नगरपालिकेतील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. पालिका निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या विकासाच्या आश्वासनां नुसार १०० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. शहरातील रस्ते, पथदिवे व इतर मूलभूत नागरी सुविधांसाठी २०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भरत गावीत व लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी सांगितले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *