
तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रात्रीच्या वेळी समोरून येणारे अथवा जाणाऱ्या वाहनांना लक्षात न आल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत या घटनांना आळा बसावा यासाठी येथील प्रवासी महासंघ तळोदा तालुका शाखेचे तर्फे परिसरातील केदारेश्वर खांडसरी व श्रीकृष्ण खांडसरी दोन्ही साखर कारखाना अंतर्गत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाड्या व इतर वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर लावण्याच्या उपक्रम राबविण्यात आला.

तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या हस्ते रेडियम रिफ्लेक्टर लावत उपक्रम राबविण्यात आला. शहराच्या शहादा व अक्कलकुवा रोडला दोन्ही बाजूला असणाऱ्या खांडसरी साखर कारखान्याच्या ऊसतोड करणाऱ्या वाहनांना हे रेडियम रिफ्लेक्टर बसवण्यात आले जेणेकरून रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर चमकल्याने वाहक चालक सावध होऊन अपघाताच्या होणाऱ्या दुर्दैवी घटनांना आळा बसू शकेल मोठी मदत होईल.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक राजन मोरे ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉक्टर संजय शर्मा , प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष ॲड.अल्पेश जैन सचिव प्रा. राजाराम राणे प्रा. रमेश मगरे ,जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी ,रमेश कुमार भाट पंडित भामरे, चेतन शर्मा कुशल जैन, चेतन धानका यांच्यासह पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचारी , प्रवासी महासंघ ग्राहक पंचायत कार्यकर्ते ऊसतोड वाहतूक करणारे वाहनचालक उपस्थित होते प्रवासी महासंघच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे याप्रसंगी ऊस वाहतूक करणाऱ्यांच्या वाहनांचे अपघात घडू नये म्हणून प्रवासी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस निरीक्षक मोरे यांनी वाहन चालकांशी संवाद साधून त्यांचे प्रबोधन केले.

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघातर्फे वाहतूक करणाऱ्या वाहनाना रेडियम रिफ्लेक्टर बसवण्याच्या उपक्रम राबवल्या ही बाब कौतुकस्पद आहे यामुळे रात्रीचे वेळी घडणाऱ्या अपघातांना घटना आळा बसू शकेल.
पोलीस निरीक्षक राजन मोरे तळोदा.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रात्री दुसऱ्यांना दिसेल असे रेडियम रिफ्लेक्टर लावले तर होणाऱ्या अपघात यांना टाळा बसेल.
ॲड. अल्पेश जैन
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ तळोदा
- 0
- 0
- 0
- 0





