खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी  बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड

नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन, निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी नंदुरबार जिल्ह्यातील किसन पावरा, व्हाईस चेअरमन पदी शिंदखेडा गटातील संजय पुंडलिक पाटील, मानद सचिव पदी शिरपूर गटातील चंपालाल पावरा, व खजिनदार पदी शहादा येथील दिनेश गोपीचंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तसेच नंदुरबार शाखेच्या शाखाध्यक्ष पदी श्रीमती कल्पनाताई वसावे यांची बिनविरोध निवड झाली. या मतं पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


                      धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन पदाधिकारी बिनविरोध प्रक्रियेसाठी राज्याचे संजीव निकम यांचे मार्गदर्शन लाभले. जळगाव जिल्हाध्यक्ष गोराडे, सरचिटणीस भारंबे यांचे अनमोल सहकार्य मिळाले.
तसेच धुळे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल शिंदे, जिल्हा सचिव अविनाश तिरमले व संपूर्ण जिल्हा कार्यकारणी , नंदुरबार जिल्हा अध्यक्ष दौलत कोकणी, सचिव गणेश मोरे मानद अध्यक्ष शरद पाटील व संपूर्ण नंदुरबार जिल्हा कार्यकारणी, संघा चे अध्यक्ष हिम्मत वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची बिनविरोध प्रक्रिया पार पडली.
सदर निवडणुकीचे कामकाज अमोल येंडाईत यांनी बघितले. सदरकामी पतसंस्था कर्मचारी शरद पाटील व पतसंस्थेचे कर्मचारी यांचे मदत मिळाली.
                   सदर निवडणुक बिनविरोध व्हावी म्हणून माघार घेतली सुनील देसले, श्रीमती सारिका परदेशी, संदीप देवरे, शिंदखेडा गटातील संजय बोरसे, डी. के. बोरसे, श्रीमती सुरेखा ठाकरे शिरपूर गटातील रमेश जाधव, भावसार पावरा व साक्री गटातील छोटू ठाकरे, विनोद भदाणे, श्रीमती सुनंदा राठोड, नंदुरबार येथील बी. पी. गिरासे, विनोद ढोडरे, किशोर शिरसाठ, हेमंत पाटील, पंकज पिंपळे, श्रीमती दक्षता वसावे, श्रीमती. टीना पाडवी, राजेश भोये आदींसह अनेक बांधवांचे बिनविरोध निवणूक साठी सहकार्य मिळाले, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

                सन 2026 ते 2031 साठी नूतन पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. चेअरमनपदी किसन पावरा, व्हॉइस चेअरमन
एस पी पाटील, मानद सचिव चंपालाल पावरा, खजिनदार
दिनेश पाटील, नंदुरबार शाखाध्यक्ष श्रीमती कल्पना वसावे, प्रवीण बोरसे , प्रवीण गिरासे, श्रीमती तारकेश्वरी सोनवणे, श्रीमती स्मिता तोरवणे, श्रीमती गीता बैरागी, कैलास जाधव, राहुल मोरे, रोहिदास पावरा, शरद गायकवाड, किशोर पराडके, गणेश चौरे, नरेंद्र पडवी, उमेश जाधव. आदींची निवड करण्यात आली.

                   सदर निवडणूक वेळी धुळे जिल्हा उपाध्यक्ष जितू गवळी, मानद अध्यक्ष गोकुळ ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष उमाकांत बोरसे, कार्याध्यक्ष चेतन पाटील, कोशाध्यक्ष चत्रू पवार, धुळे तालुका अध्यक्ष आर. ए. पाटील, तालुका सचिव आबा पवार, शिरपूर तालुका सचिव जितू पावरा, माजी संचालक चयनसिंग गिरासे, एल. टी. पाटील, गोकुळ झालसे, नितीन अहिरराव, भारत पाटील, निलेश वाघ, शरद कोळी, विकास पाटील, हेमंत चौधरी, रमेश जाधव व नंदुरबार जिल्हा मधील जेष्ठ मार्गदर्शक संजय देवरे, कुवरसिंग नाईक, सतीश पाटील, प्रशांत पाटील, महेश पाटील अनेक बांधव उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी पतसंस्था प्रगती साठी कटिबद्ध असल्याचे मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शिंदे यांनी लवकर पतसंस्थाची स्वतःची नवीन वास्तू उभारण्याचा विश्वास दिला.
निवड प्रक्रिय अतिशय आनंदाच्या वातावरण मध्ये पार पाडली. उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनी यांनी विजय उत्सव साजरा केला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *