नंदुरबार

वाण्याविहीर व अक्कलकुवा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन 

वाण्याविहीर व अक्कलकुवा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .

वाण्याविहीर बस स्थानकावरून अक्कलकुवा येथील पोलीस उपनिरीक्षक वृषाली गांगुर्डे , श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, सरपंच भूपेंद्र पाडवी, रंजना राऊत,श्री सातपुडा वैभव विद्यालयाचे प्राचार्य हंसाबेन पाडवी, विद्या विकास संस्थेचे संचालक वैभव पाडवी, भूषण पाडवी, शुभम पाडवी,मनोज पाडवी, रमाकांत पाडवी, विष्णू पाडवी , अश्वत्थामा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. जसपाल वळवी यावेळी उपस्थित होते.


रॅली ची सुरुवात माजी मंत्री कै. दिलवरसिंग दादा संकुलापासून करण्यात आली व वाण्याविहीर गावातून सुरुवात होऊन अक्कलकुवा येथील कुबेर पार्क येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी अक्कलकुवा येथील वाहतूक पोलिसांनी सहभाग नोंदवला होता. येणाऱ्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये देशभक्तीच्या जागर करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे असतात. यावेळी पंचक्रोशीतील सरपंच युवक व विद्या विकास संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *