नंदुरबार

शेजवा शाळेत विश्व आदिवासी दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा

शेजवा शाळेत विश्व आदिवासी दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा

   नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो :       नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेजवा गावाचे मा. सरपंच विजयसिंग वसावे, पोलीस पाटील योगेश वसावे उपसरपंच मुन्ना वसावे, तापसिंग वसावे, मानसिंग वसावे, परमेश वसावे उपस्थित होते अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते याहा मोगी माता, तंट्या भिल, बिरसा मुंडा, खाजा नाईक, उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीच्या पेहराव परिधान करून विविध आभूषणे घालून विविध आदिवासी गीतांवर नृत्य सादर केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील,शिक्षक विजय पवार दिपक वळवी रामानंद बागले हारूणखाॅं शिकलीगर संजय बोरसे संदीप गायकवाड श्रीमती संगीता गोखले कनिष्ठ लिपिक नेहा शर्मा यादींसह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांसोबत आदिवासी परंपरा असलेली शिबली डोक्यावर घेऊन आदिवासी गीतांवर ठेका धरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक दीपक वळवी यांनी केले. तर आभार आनंदराव पवार यांनी माणले सदरील कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *