नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा

तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा शहरातील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाचा समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा, कला तसेच निसर्गाशी असलेले अतूट नाते याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी विद्यामंदिरातील आदिवासी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षिका रुख्मिनी खर्डे यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. विद्यार्थ्यांनीही आकर्षक आदिवासी वेशभूषा परिधान करून पारंपरिक नृत्य व गीतांचे सादरीकरण केले. या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडविले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल व मुख्याध्यापक गणेश बेलेकर प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी शिक्षक संदीप चौधरी, देवेंद्र शिंपी, अरुण कुवर, चंद्रकांत भोई, सागर मराठे, कमलेश पाटील, प्रतिभा गुरव, अश्विनी भोपे, योगिता सोनवणे, सुदाम मुजगे, राजेश मराठे, अंकित डोंगरे, रंजना शिंदे, निशा गावीत, रोहिणी कोकणी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिन पाटील यांनी केले. विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी संस्कृतीविषयी अभिमान, जाणीव आणि संवेदनशीलतानिर्माण झाली.
- 0
- 0
- 0
- 0





