नंदुरबार

नेमसुशिल विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिन साजरा

नेमसुशिल विद्यामंदिरात विश्व आदिवासी गौरव दिन साजरा

   तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:-         तळोदा येथील नेमसुशिल व श्रीमोती माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे 9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारक धरती आबा भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल, खाज्या नाईक यांसारख्या थोर क्रांतिकारकांबद्दल माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये समूह नृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी मनस्वी कुवर व योगिनी सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील परदेशी तसेच प्रमुख अतिथी म्हणून  इच्छाराम बैसाणे संदीप वसावे, श्रीमती रेखा मोरे, माधुरी पाटील, सविता खोंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र गुरव, सायसिंग वसावे, बादल वसावे , सचिन पंचभाई, मुकुंदा महाजन, सरिता नाईक, वर्षा पावरा यांनी परिश्रम घेतले.
संस्थाध्यक्ष निखिल भाई तुरखिया , उपाध्यक्ष दगेसिंग महाले सचिव संजय पटेल संचालिका सोनाबेन तुरखिया व संस्था समन्वयक हर्षिलभाई तुरखिया यांनी विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *