नंदुरबार

प्रलंबित भूसंपादन प्रस्तावांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा संबंधित यंत्रणांनी समन्वयातून विहित कालमर्यादेत प्रस्ताव निर्गत करावेत; विलंब टाळण्याच्या डॉ.मित्ताली सेठी यांच्या सूचना

प्रलंबित भूसंपादन प्रस्तावांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा

संबंधित यंत्रणांनी समन्वयातून विहित कालमर्यादेत प्रस्ताव निर्गत करावेत; विलंब टाळण्याच्या डॉ.मित्ताली सेठी यांच्या सूचना

नंदुरबार, दि. ४ ऑगस्ट : जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी प्रलंबित असलेल्या भूसंपादन प्रस्तावांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीत प्रलंबित प्रकरणांतील अडचणी, आवश्यक कार्यवाही तसेच प्रस्ताव निर्गत करण्याच्या प्रक्रियेचा सखोल आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी संबंधित भूसंपादन अधिकारी, सक्षम प्राधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख तसेच संपादन संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक प्रकरणाची माहिती घेतली.

विविध विकास प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन वेळेत पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार सर्व कार्यवाही काटेकोरपणे पूर्ण करण्याबरोबरच संबंधित विभागांनी परस्पर प्रभावी समन्वय ठेवून कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले.

खाजगी वाटाघाटीद्वारे संपादन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतील भूसंपादन प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तांत्रिक पडताळणी आणि विभागीय समन्वय वेळेत पूर्ण करून प्रस्ताव विहित कालमर्यादेत निर्गत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

भूसंपादन प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घेऊन प्रलंबित प्रकरणांचा नियमित पाठपुरावा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

बैठकीस संबंधित भूसंपादन अधिकारी, सक्षम प्राधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, संपादन संस्थांचे अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विकास प्रकल्पांना गती मिळावी आणि भूसंपादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम, पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *