खेळ नंदुरबार

शालेय क्रीडा स्पर्धेचे लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन

शालेय क्रीडा स्पर्धेचे लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन

तळोदा सप्त नगरी न्युज ब्युरो

तळोदा येथील एस. ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूलात शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन 16 व 17 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा शहराचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष भाग्यश्रीताई योगेश चौधरी, योगेशभाऊ प्रभाकर चौधरी, उपनगराध्यक्ष शितल लक्ष्मण पाडवी (पटेल), तसेच नगरसेवक रामानंद ठाकरे, हर्षा मनोज पाडवी व इमरान खाटीक यांनी उपस्थिती लावली. हंसा कलाल यांनी प्रमुख अतिथीचा परिचय करून दिला. मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे शॉल व बुके देऊन सत्कार केला.

             उद्घाटन प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य तसेच लेझीम पथक, घुंगरू काठी पथक व डंबेल्स पथक आपल्या कवायती सादर केल्या तसेच चित्त थरारक असे पिरॅमिड सुद्धा मुला व मुलींनी करून दाखवले. उपनगराध्यक्ष शितल लक्ष्मण पाडवी (पटेल) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत खेळाचे महत्व प्रतिपादन केले तर नगराध्यक्ष भाग्यश्रीताई चौधरी यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व आरोग्य याविषयी माहिती सांगितली. यावेळेस प्रमुख पाहुणे भाग्यश्रीताई व योगेश भाऊ चौधरी यांच्या हस्ते 100 मिटर धावणे या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस नगराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेचे ही पाहणी केली तसेच शाळेतील स्टेम लॅबला भेट देऊन शाळेचे कौतुक केले.

           मुख्याध्यापक नाईक सरांनी शाळेतील शालेय व शालेय उपक्रम बाबत पाहुण्यांना माहिती सांगितली व खेळण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वाचे तसेच निर्णय क्षमता घेण्याची कौशल्य प्राप्त होते व विद्यार्थी शारीरिक मानसिक व बौद्धिक दृष्ट्या सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन केले.

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल पाडवी यांनी तर आभार प्रदर्शन किरण  मगरे यांनी मांडले. पंच म्हणून शुभम कर्मा,  नीलकं सूर्यवंशी, देवधान वळवी, विकास वाडीले व शरद साळवे यांनी भूमिका पार पाडली. तर राजेंद्र पाडवी व किरण मगरे यांनी स्कोरर ची भूमिका पार पाडली .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *