आरोग्य नंदुरबार

नंदुरबार येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट

नंदुरबार येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट

नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो

  नंदुरबार येथील उभारण्यात येत असलेल्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजली शर्मा यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, विविध विभागांची रचना, उपलब्ध व प्रस्तावित सुविधा तसेच सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

         भेटीदरम्यान संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांकडून कामकाजाबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची गुणवत्ता, रुग्णसेवा व शैक्षणिक सोयीसुविधा याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना मा. अंजली शर्मा यांनी दिल्या. उर्वरित बांधकाम व संबंधित कामे ठरलेल्या कालमर्यादेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

नंदुरबार जिल्ह्यासाठी हे वैद्यकीय महाविद्यालय आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, भविष्यात जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

(Collector Office Nandurbar)

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *