नंदुरबार

करिअर नियोजन व उत्तरलेखन कौशल्यावर मार्गदर्शनयोग्य आहार, अभ्यासाचे योग्य नियोजन व पुरेशी झोप यश निश्चित प्रा.मोरे.

करिअर नियोजन व उत्तरलेखन कौशल्यावर मार्गदर्शन
योग्य आहार, अभ्यासाचे योग्य नियोजन व पुरेशी झोप यश निश्चित प्रा.मोरे..


तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो

भारतीय जैन संघटना, देवमोगरा विद्याप्रसारक मंडळ तळोदा तसेच सहयोग सोशल ग्रुप, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर कंपास/मार्गदर्शन व पेपर रायटिंग स्किल (Without Fear, Stressfree Paper Writing and Time management) या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले,

         कार्यक्रमाची द्वीप प्रज्वलनाने या  सुरुवात करण्यात आली,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवमोगरा विद्याप्रसारक मंडळ अध्यक्ष कन्या विद्यालय चेअरमन चेतन पवार हे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र मोरे व प्रा. डॉ. स्वप्निल वाणी यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्पर्धात्मक परीक्षां अध्ययानाची तयारी तसेच तणावमुक्त पद्धतीने उत्तरपत्रिका लेखनाचे महत्त्व पटवून दिले, योग्य आहार पुरेशी झोप तसेच वेळेचे नियोजन बाबत माहिती दिली.

     कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे सर यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जाण्याचा सल्ला देत सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे समन्वयक निमेश सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना योग्य दिशा, नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन केले.यावेळी जिल्हाध्यक्ष भारतीय जैन संघटना व सहयोग सोशल ग्रुपचे ॲड. अल्पेश जैन, शरद सूर्यवंशी, राजाराम राणे ,चेतन धानका आदी मान्यवर सह योगेश पाटील, दिलीप तडवी, वैशाली देवरे, भाग्यश्री सागर, उल्हास मगरे,आदी उपस्थित होते.

          कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल मगरे, हिरालाल पाडवी, धनराज केदार, सुदाम माळी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या मार्गदर्शन व्याख्यानाला विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमामुळे, विद्यार्थिनींमध्ये करिअर विषयक जागरूकता वाढून परीक्षेतील भीती दूर करण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *