नंदुरबार

बारावी परीक्षा सुरळीत सुरू, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

बारावी परीक्षा सुरळीत सुरू, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा बारावी परीक्षा सीसीटीव्ही ची कडक नजरेखाली व चोख पोलीस बंदोबस्तात परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली असून तळोदा तालुक्यातील इयत्ता बारावीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी तळोदा येथील आप्पासाहेब गिरधार एकनाथ माळी कनिष्ठ महाविद्यालय तसेच न्यू हायस्कूल व शी.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय तसेच नेम सुशील विद्या मंदिर या ठिकाणी परीक्षा केंद्र ६१५ निश्चित करण्यात आले होते.

गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे पूर्वनियोजन करण्यात आले होते. तालुक्यात एकूण आठ कनिष्ठ महाविद्यालय असून एकूण १३९९ विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. यात कानिष्ठ महाविद्यालयात केंद्रप्रमुख म्हणून के आर परमार उपकेंद्र प्रमुख महेंद्र लोहार व भास्कर मराठे तर न्यू हायस्कूल व शी.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयात उपकेंद्र प्रमुख म्हणून एस एस सूर्यवंशी व अतुल सूर्यवंशी तर नेम सुशील विद्यामंदिर सुनील परदेशी उपकेंद्र प्रमुख यांनी कामकाज पाहिले एकूण खोल्यांमध्ये ५६ सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रथमच अशा पद्धतीने सीसीटीव्ही च्या समोर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेच्या कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नातेवाईक मित्रपरिवार यांनी केंद्राच्या बाहेर गोंधळ करू नये यासाठी पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त लावण्यात आल्याने गैरप्रकारांना काळापासून परीक्षा यंत्रणा व पोलिसांना यश आले आहे.
वरिष्ठ महाविद्यालयात ७०० विद्यार्थी, न्यू हायस्कूल केंद्रात ४५० विद्यार्थी तर नेम सुशील केंद्रात २४९ विद्यार्थी परीक्षेसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *