आंतरराष्ट्रीय नंदुरबार महाराष्ट्र राष्ट्रीय

National YESummit 9th | देशभरातील उद्योजकांचा संगम, नंदुरबारची दमदार उपस्थिती

National YESummit 9th | देशभरातील उद्योजकांचा संगम, नंदुरबारची दमदार उपस्थिती

हैदराबाद | दि. ५ ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान Youthaid Foundation, Youth Entrepreneur Federation of India (YEFi), TGIC तसेच National Institute of MSME, Telangana यांच्या संयुक्त विद्यमाने National YESummit 9th ही राष्ट्रीय स्तरावरील भव्य उद्योजकता परिषद तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली.

या परिषदचे उद्घाटन  जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी ६०० हून अधिक सहभागींना मार्गदर्शन करत उद्योजकतेचे महत्त्व, नवकल्पनांची गरज आणि युवकांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. देशातील २० राज्यांमधून उद्योजक, नवउद्योजक, महिला उद्योजक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील तज्ज्ञांनी परिषदेला उपस्थिती नोंदवून उद्योजकतेसंबंधी सूक्ष्म व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

तीन दिवस चाललेल्या या परिषदेत महिला व युवकांमध्ये उद्योजकता विकसित करणे, स्टार्टअप्स घडवणे तसेच समाज व अर्थव्यवस्थेतील उद्योजकांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती. बिझनेस पिचिंग कॉम्पिटिशन हे या परिषदेचे प्रमुख आकर्षण ठरले.

परिषदेत विक्री प्रदर्शन (Exhibition) देखील भरविण्यात आले होते. देशातील २० राज्यांतील उद्योजकांनी आपले स्टॉल्स उभारून नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना, उत्पादने व स्टार्टअप मॉडेल्स सादर केली. यामुळे उपस्थितांना विविध क्षेत्रांतील नवउद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

नंदुरबार जिल्ह्याचा उल्लेखनीय सहभाग:
नंदुरबार जिल्ह्यातून एकूण २७ उद्योजकांनी या राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला. आयोजकांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यासाठी विशेष स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला. या स्टॉलवर पुढील उद्योजकांनी आकर्षक पद्धतीने आपली उत्पादने मांडली—
मयुरी खाकरा – सक्षम गृह उद्योग
शिवशक्ती हळदी पावडर
नर्मदा पुनर्वसन मशरूम उद्योग
राजेश्वरी मिरची पावडर
मोगी भोग मोहा लाडू
विश्वाची परिवार तांदूळ विक्री व्यवसाय
कालो कुणबी सेवाभावी संस्था
श्री बद्री केदार प्रायव्हेट लिमिटेड
विशाल ट्रायबल पावडर
सूर्यदर्शन फार्म प्रोड्युसर कंपनी
वेद ऊर्जा हेअर ऑइल सोल्युशन
समर्थ ग्रुप उद्योग – पुरणपोळी रिमिक्स
प्रतीक चार्टकोण – मिलेट चार्ट (झिरो वेस्ट)
मीनाक्षी आर्ट अँड क्राफ्ट

बिझनेस पिचिंग स्पर्धेत नंदुरबारची घवघवीत कामगिरी:
नंदुरबार जिल्ह्यातून १५ उद्योजकांनी बिझनेस पिचिंग स्पर्धेत सहभाग घेतला. यामधून फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील पुढील तीन उद्योगांची निवड करण्यात आली—
मयुरी मिलेट्स – रागी लड्डू : मयुरी राजेश निकुंबे
श्री बद्रीकेदार प्रायव्हेट लिमिटेड : वैभव रघुवंशी
विशाल ट्रायबल पावडर : विशाल माधव वसावे

वरील तिघांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर सर्व उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमास जिल्हा प्रशासन नंदुरबार, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, नंदुरबार, निती आयोगचे विशेष सहकार्य लाभले.

या संपूर्ण उपक्रमाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक व टीम लीडर शिवाजी परमार, NITI Fello वैष्णवी रामदोहकर, CYDA, YEFi, Youthaid Foundation यांनी प्रभावी नेतृत्व केले. National YESummit 9th ही परिषद युवकांसाठी प्रेरणादायी ठरली असून ग्रामीण व आदिवासी भागातील उद्योजकांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे.

YouthAid Foundation

NationalYesummit #YouthEntrepreneurs #WomenEntrepreneurs #DrMittaliSethi #MSME #TribalEntrepreneurship #collectorofficenandurbar

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *