
वन वनवा सप्ताहानिमित्त तळोदा येथे वनवा व्यवस्थापन व नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन
नंदुरबार | १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान साजऱ्या होणाऱ्या वन वनवा सप्ताह उपक्रमाच्या अनुषंगाने तळोदा वनपरिक्षेत्रामार्फत वनवनवा व्यवस्थापन व वनवा नियंत्रण या उद्देशाने तळोदा वन विश्रामगृह परिसरात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत तळोदा, अक्कलकुवा व खापर वनक्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेदरम्यान माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्री. अमोल आडे यांनी मेवासी वनविभाग, तळोदा अंतर्गत मागील तीन वर्षांत घडलेल्या वनवनव्यांचा सविस्तर लेखाजोखा सादर केला. तसेच भविष्यात वनवा होऊ नये व वनवा लागल्यास तो प्रभावीपणे विझविण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
वनवनवा नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, फायर अलर्ट सिस्टीमद्वारे जलद प्रतिसाद देणे, वनकर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समिती सदस्य व स्थानिक नागरिक यांच्या समन्वयातून वनवा नियंत्रणात आणणे, तसेच नागरिकांमध्ये वनवनवाबाबत जनजागृती करण्यावर कार्यशाळेत सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी “वने ही आपली राष्ट्रीय संपत्ती असून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे,” असा संदेश देण्यात आला. सदर कार्यशाळा श्री. सुहास चव्हाण, उपवनसंरक्षक, मेवासी वनविभाग, तळोदा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
कार्यशाळेस वनपरिक्षेत्र अधिकारी तळोदा श्री. शंतनु सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी अक्कलकुवा व खापर श्री. ललित गवळी, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहयो श्री. वसंत गावित, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्राधिकारी श्रीमती कोमल सोनवणे, तसेच श्री. राजेश अंधारे, श्रीमती रजनी पाटील यांच्यासह तळोदा, अक्कलकुवा व खापर वनक्षेत्रातील मोठ्या संख्येने वनपाल व वनरक्षक उपस्थित होते.
(Collector Office Nandurbar)
FireManagement #ForestProtection #collectorofficenandurbar
- 0
- 0
- 0
- 0





