
नेमसुशिल समूहात नवोगतांचे स्वागत
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात नवोदित विद्यार्थ्यांचे अध्यात्म व तंत्रदान यांचा संयुक्त मेळ घालून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पुरोहित करवी मंत्रोच्चारन व रोबोटीक वेल कम डान्सच्या सादर करण्यात आले.
यावेळी नेमसुशिल शैक्षणिक समूहातील संचालिका सोनाभाभी तुरखीया संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखीया संस्था स्नेही अर्जुनभाई उपस्थित होते पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमती बागुल मॅडम यांच्या संकल्पनेतून पुरोहित करवी मंत्रोच्चार करून विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा तर रोबोटीक डान्स गणेश बेलेकर यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात यावा असे सूचित करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांचे औक्षण करून चॉकलेट वाटप करण्यात आले.प्रवेशोत्सव यशस्वीतेसाठी मुख्या.पुष्पा बागुल मुख्या.गणेश बेलेकर मुख्या.अर्चना पाडवी शिक्षक संदिप चौधरी देवेंद्र शिंपी अरुण कुवर चंद्रकांत भोई सागर मराठे सचिन पाटील कमलेश पाटील राजेश मराठे सुदाम मुजगे अंकित डोंगरे शैलेंद्र पाटील श्रीमती प्रतिभा गुरव रुख्मिनी खर्डे अश्विनी भोपे संगीता पटेल अलका पाडवी योगिता सोनवणे रंजना शिंदे पूनम गुरव ज्योती गावीत समाधान मराठे ईश्वर मराठे शरद पाडवी आदींनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





