नंदुरबार पुणे

भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद

भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद

नाशिक कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. साधारणत: दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येण्याची शक्यता आहे. नाशिक कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. साधारणत: दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखडा या विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे.

या विकास आराखड्याअंतर्गत भाविकांसाठी सुरक्षित, सुयोग्य व सुसज्ज सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आलेली आहे. नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याची कामे सध्या प्रगतिपथावर असून कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कुंभमेळ्याच्या वेळेस भिमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जूना सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्यामुळे नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून त्याबरोबरच पायरी मार्गाचे काम देखील सुरू करण्यात आलेले आहे.

मुख्य सभामंडप पुर्णत उतरविण्यात आल्यामुळे नवीन सभामंडप तयार करताना श्री भिमाशंकर येथे रोज होणारी गर्दी लक्षात घेता मंदीर दर्शनासाठी बंद केल्याशिवाय काम करणे शक्य होणार नव्हते. या कामांमुळे महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *