भाजपा माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी – बबनराव चौधरी
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री यांना निवेदन
नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई / नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-भारतीय जनता पार्टी माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विजय चौधरी यांनी विविध नेत्यांशी व विविध क्षेत्रातील व्यक्तींशी मोबाईलवर संवाद करतांना कोणाबद्दल कशी भाषा वापरली हे दर्शवणाऱ्या अनेक ऑडिओ क्लिप्स प्रसारित झाल्या आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहेच. त्यातून स्पष्टपणे समोर आले आहे की, प्रशासनातील अधिकारी, राज्यस्तरीय व्यक्ती, भाजपाचे मंत्री, वरिष्ठ मान्यवर असो किंवा स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी असो त्या सर्वांमध्ये चुकीच्या भावना आणि द्वेष पसरवण्याचे काम ते सातत्याने करीत होते हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येते. त्यांच्या बोलण्यात स्व पक्षाच्या महिला नेत्यांबाबतीत अश्लील शिवीगाळ आहे. त्यामुऴे नंदुरबार जिल्हाच्या जनतेसह संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी की, विजय चौधरी यांची भाजपातून तातडीने लवकरात लवकर हकालपट्टी करण्यात यावी. हिच मागणी मी भाजपा नंदुरबार जिल्हा प्रभारी या नात्याने आपल्याकडे करीत असल्याचे निवेदन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांचाकडे नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांनी मूंबईत दि. 4 आँगस्ट 2026 रोजी भेट घेवुन निवेदन सादर केले आहे.
निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी यांना हि दिल्या आहेत. देतेवेऴी सोबत भाजपा प्रदेश सदस्य डाँ. शशिकांत वाणी, नंदुरबार भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, तऴोदा माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा अल्पसंख्यक मोर्चा प्रदेश सरचिटणीस एजाज शेख, नंदुरबार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिनेश खंडेलवाल, शहादा मंडऴ अध्यक्ष अतुल जयस्वाल, निलेश चौधरी, देविदास माऴी, आशिष कडोसे, अँड. प्रकाश भोई हे होते. निवेदनात म्हटले आहे की, भाजपा माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी त्यांचावर नंदुरबारमध्ये याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला आहे. अनेक पोलीस स्टेशनमध्ये लोकांनी फिर्यादी दिलेल्या आहेत विजय चौधरी यांनी आपल्या ऑडिओ क्लिप्स मध्ये शिवीगाळ करून अश्लील भाषा वापरली आहे व अनेक जातीजातीमध्ये त्यांच्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे नंदुरबार, जऴगाव व धुऴे जिल्ह्यासह इतर ठिकाणी सुद्धा त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात निवेदन, मोर्चे काढण्यात येत आहेत त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी त्या त्या जातीचे मोर्चे निघत आहेत व त्यांचामुऴे नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाजपाची बदनामी होत आहे नंदुरबारच्या जनतेसह संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी की, विजय चौधरी यांना भाजपातुन हकालपट्टी करावी. याबाबत नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणुन मी यापुर्वीच आपल्याला लक्षात आणुन दिले आहे. असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांचाकडे नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांनी मूंबईत दि. 4 आँगस्ट 2026 रोजी भेट घेवुन निवेदन दिले आहे. पुढे म्हटले आहे की, पडद्यामागून पक्ष विरोधी लोकांना मदत करण्यासाठी कुटील कारस्थान रचणारा विजय चौधरी हा व्यक्ती भाजपात राहणे हे पक्षाचे हिताचे राहणार नाही पक्षविरोधी त्यांनी केलेल्या कारवाया आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल निर्माण झालेली संतप्त भावना लक्षात घेता भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी (आपण) त्यांना नुसते पदावरून हटवू नये तर तातडीने पक्षातून हकालपट्टी करावी हीच सर्वांची मागणी आहे. तरी नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणून आपणास माझी विनंती आहे की, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने जनभावनेचा आदर करुन विजय चौधरी यांची भाजपातुन लवकरात लवकर हकालपट्टी करावी. असे निवेदन नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांना मुंबईत भेटुन दिले आहे. तर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी यांना हि दिल्या आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





